मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू

0
35

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे नाव मनसुख हिरेन असून यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचे त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटीनच्या स्पॉटकांनीन भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती.24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.मुकेश अंबानी यांच्या घराखाली जिलेटीन आणि धमकी वजा पत्र  आढळलेल्या स्कॉर्फीयो गाडीच्या मालकाची नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी  बेप्तता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.