मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेला होळी, धूलिवंदनाच्या शुभेच्छा 

0
27

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदन सणाच्याशुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटाच्यापार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सणसर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनसुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.