मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण 

0
24

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती समोर येतीये मात्र याबाबद अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.यानंतर त्यांच्या आई रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत तसेच त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.