मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

0
20

वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतलाय. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात लसीचा पहिला डोस घेतला होता.मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली होती.
सध्या कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हे लक्षात घेता लसीकरण मोहिमेला वेग देण्याची चर्चा आहे. सध्या देशात 45 वर्षांवरील लोक लस घेत आहेत. त्याचवेळी, विरोधी पक्ष म्हणतात की सर्व वयोगटातील लोकांना लसीच्या कक्षेत आणले पाहिजे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून आतापर्यंत देशात 8.83 कोटी लोकांना लसी देण्यात आल्या आहेत.