मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट

0
21

मुंबई: लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले , कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. कोविड लसीकरणाला राज्यात गती देण्यात आली असून पुढील काळात हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोविड लसनिर्मितीद्वारे हाफकिन इन्स्टिट्यूट यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवू शकते.