मेहुल चोक्सीची ईडी कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका, ईडीचाही हायकोर्टात अर्ज

0
22

पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीनं मुंबई सत्र न्यायालयानं जारी केलेले निर्देश रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला विरोध करत तपासयंत्रणेच्यावतीनंही हायकोर्टात अर्ज सादर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं याची प्रत अद्याप याचिकाकर्त्यांना दिलेली नसल्याबद्दल गुरुवारी हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर यावर गरुवारी सुनावणी पार पडली.  कायदेशीर कागदपत्रांची पूर्तात न झाल्यामुळे हायकोर्टानं चोक्सीच्या याचिकेवरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली. मेहुल चोक्सी हा एक फरार आर्थिक गुन्हेगार असून अजामिनपात्र वॉरंट बजावूनही होत देशात परत येऊन तपासयंत्रणेपुढे हजर होत नाही. यावरून तो गुन्हेगारच आहे हे सिद्ध करण्यास आणखीन नवा पुरावा कशासाठी हवा? असा दावा ईडीनं मुंबई सत्र न्यायालयात केला होता.मात्र हायकोर्टानंही चोक्सीला तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकारच दिला आहे.