- कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना देखील कोरोनामुळे जीव गमावावा लागला आहे
- त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे
- या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे
- या पत्रात राज ठाकरे म्हणाले मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते
- “त्यांनी त्यांचे या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे”
- ‘पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली त्याने मात्र माझं मन विषण्ण झालं”