‘या’ प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी -शरद पवार

0
25

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले आहे. यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले.