‘या’ प्रकरणाबाबद ज्युलिओ रिबेरो यांनी नाकारली शरद पवार यांची विनंती, म्हणाले ‘ही अतिशय अवघड …

0
28

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले आहे. यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती.यावर निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरिओ यांनी शरद पवार यांची विनंती नाकारली आहे.एका माध्यमाशी बोलताना ते म्हणाले “ही एक अतिशय अवघड परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही ऑफर घेणार नाही. “