‘या’ विद्यापीठाने देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थाननिर्माण करावे, राज्यपालांनी व्यक्त केली अपेक्षा

0
17

मुंबई: गुरु गोविंदसिंह यांच्यावास्तव्याने पुनीत झालेले नांदेड एक प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. नांदेडला देशात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे तेथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (स्वरातीम) विद्यापीठाने देखील प्रयत्नपूर्वक देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करावे व ऑक्सफर्डप्रमाणे नांदेडला गुणवत्तेचे सर्वोत्तम केंद्र करावे, अशी सूचनावजा अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थमराठवाडा विद्यापीठाचा २३ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. ४) संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून संबोधन करताना राज्यपाल बोलत होते.

दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, स्वरातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन व विद्यापीठाच्या विविध प्राधिकृत मंडळांचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.

दीक्षांत समारोहास उपस्थित सर्व स्नातक, पीएच.डी. प्राप्त उमेदवार तसेच सुवर्ण पदक विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, सध्याचे युग आंतरशाखीय अध्ययनाचे आहे. अश्यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी टीम स्पिरिटने तसेच परस्पर सहकार्याने काम केल्यास सफलता निश्चितपणे प्राप्त होईल.

Leave a Reply