योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद,म्हणाले ‘कोरोना काळात योग म्हणजे आशेचा किरण’

0
31

आज सातव्या आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. सातव्या योग दिनानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जग आज कोरोना महामारीशी झुंज देत आहे. या काळात योग हा सर्वांसाठी आशेचा किरण बनला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे योग दिनानिमित्त कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. मात्र योग दिनाचा उत्साह कायम आहे. ‘योगा फॉर वेलनेस’ ही यंदाच्या योग दिनाची थीम असल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले. संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व समजले आहे. कोरोना काळात योग करणे अधिक गरजेचे आहे. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्राणायामामुळे श्वसनक्रिया बळकट होते. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. घरी राहून योगा करा आणि निरोगी रहा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.