माणुसकी जपली! रक्‍ताच्‍या नात्‍यांनी दूर लोटले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकारांनी केला अंत्यसंस्कार

0
19

आजकाल कोरोनामुळे अनेक रक्ताचे नाते सुद्धा परक्यांप्रमाणे वागू लागलेत.असाच अनुभव म्‍हसळा तालुक्‍यात आला. कोरोनामुळे मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यास घरच्‍यांनी नकार दिला अखेर पोलीस , महसूल कर्मचारी आणि पत्रकार धावून आले आणि त्‍यांनीच अंत्‍यसंस्‍कार पार पाडले आणि कोरोनासारख्‍या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.

महसळा तालुक्‍यातील दुर्गम डोगराळ भागात असलेल्‍या केलटे गावातील एका 76 वर्षीय वृदधाचा 30 मे रोजी रात्रीच्‍या सुमारास कोरोनामुळे मृत्‍यू झाला. परंतु घरच्‍यांनी मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास आणि अंतिम संस्‍कार करण्‍यास नकार दिला . त्‍यांचा मुलगा काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्‍या जीवघेण्‍या आजारातून बाहेर आला होता तोदेखील वडिलांच्‍या अंत्‍यविधीसाठी पुढे आला नाही किंवा कुणी ग्रामस्‍थांनीदेखील याकामी पुढाकार घेतला नाही.ग्रामीण भागात कोरोनाविषयी प्रचंड भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे . अशावेळी मृतदेहावर अंतिम संस्‍कार कुणी करायचे हा मोठा प्रश्‍नच होता.
कोणतीही भीती न बाळगता अंगावर पीपीई कीट चढवले आणि मग तिरडी बांधायला सुरूवात केली. स्‍मशानभूमी गावापासून दूर 2 किलोमीटर अंतरावर . या मोजक्‍याच मंडळीनी तिरडीला खांदा देवून अंतिम संस्‍कार पूर्ण केले. त्‍यांच्‍या या धाडसाचे आणि दाखवलेल्‍या माणूसकीचे परीसरात कौतुक होत आहे. कोरोनाने लोकांना बरंच काही शिकवलं . धर्म, जात पातीच्‍या भींती कोसळून पडल्‍या. सर्व भेद विसरून लोक प्रत्‍येकाला जमेल तशी मदत करीत आहेत. म्‍हसळयातील केलटे गावातील हा माणूसकीचा धर्म सांगणारा प्रसंग बरंच काही शिकवून गेला एवढं मात्र नक्‍की.

Leave a Reply