राजकारण तापले! सायंकाळी राष्ट्रवादीची पुन्हा बैठक

0
29


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केल्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. यामुळे राजकारण तापले असून सध्या दिल्लीतील संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक संपली आहे. खासदार सुप्रिया सुळेसुद्धा बैठकीला उपस्थितीत होत्या. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा या उपस्थित होते. आज संध्याकाळी राष्ट्रवादीची पुन्हा बैठक  होणार आहे. या बैठकीसाठी जयंत पाटील आणि अजित पवार सुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत.