‘राज्यपालांकडे हे चोरांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार’ – प्रकाश आंबेडकर

0
37

काही दिवसांपासून राजकारणात गोंधळ सुरु आहे. शनिवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले होते, त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेना महिन्याला  शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप केला आहे.

त्यामुळे आता विरोधकांकडून अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. तसेच आता या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील आता सरकारवर टीका केली आहे. ‘हे चोरांचे तसेच खुन्यांचे सरकार आहे, राज्यपालांकडे हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या संदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सोमवारी भेट घेणार आहेत.