राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण, घेतला दुसरा डोस

0
22

मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. 5 मार्च रोजी राज्यपालांनी याच शासकीय रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता.करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.