राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी

0
22

राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे. 
अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे