राज्यातील नगरपरिषदांमधील विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा 

0
24

राज्यातील चंद्रपूर, कणकवली, मालवण व सिल्लोड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध बैठकांच्या माध्यमातून आज आढावा घेतला.नगरपरिषदांच्या हद्दीतील विकासकामे वेळेत पूर्ण करताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन यासारखे प्रकल्प मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याचे शिंदे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत परिक्षेत्रातील जागा परमपूज्य भालचंद्र महाराज देवस्थानास हस्तांतरित करण्याकरिता तसेच मालवण येथे उभारण्यात येणाऱ्या म्युनिसिपल प्लाझा आणि मत्स्यालया संदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली. मालवण येथे होणारे मत्स्यालय पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नगरविकासमंत्री शिंदे यांनी सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाबाबत चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करून घनकचरा व्यवस्थापनाबाबत नियोजनपूर्ण व अभ्यासपूर्ण काम होण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश यावेळी मंत्रीद्वयांनी दिले.