राज्यात २४ तासात २५८३३ रुग्णांची नोंद,रिकव्हरी रेट पोहोचला ९०.७९ टक्क्यांवर

0
40

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे .यासाठी अनेक जिह्यात कडक निर्बंध लावल्या गेले आहेत. यामध्ये आज राज्यात 25833 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व आज नवीन 12764 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे मात्र रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण शुद्ध वाढत आहे. यामध्येच गेल्या 24 तासात एकूण 2175565 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.आता राज्यात एकूण 166353 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.79% टक्क्यांवर पोहोचले आहेत.