राज्यात २४ तासात ३०५३५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ ,रिकव्हरी रेट पोहोचला ८९.३२ टक्क्यांवर

0
23

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.राज्यातील मंत्रिमंडळात सुद्धा कोरोनाचा प्रसार होत आहे.राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.मात्र यामध्ये रुग्ण बरे होण्याचे संख्या सुद्धा वाढत आहे.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.