राज्यात 24 तासात 56,286 नवे रुग्ण, 685 जणांचा मृत्यू

0
18

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,862  लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 32,29,547 वर गेली आहे. 
राज्यात गुरुवारी (8 एप्रिल) कोरोनाचे 56,286 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32,29,547 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 26 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 26,49,757रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Reply