राज्यात 24 तासात 9,101 रुग्ण कोरोनातून बरे, 9,361 नव्या रुग्णांची नोंद

0
34

राज्यात आज 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9,101 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 इतकी झाली आहे. आज 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 10,373 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.सरसकट अनलॉकमुळे नंबर वाढत असल्याचं दिसून येत आहे. काल नवी मुंबईत शून्य होते नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आज 178 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. .