रामायण फेम ‘आर्य सुमंत’ चंद्रशेखर वैद्य यांचे निधन

0
35

पौराणिक मालिका रामायण फेम ‘आर्य सुमंत’ म्हणजेच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्याची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्याच्यासाठी घरीच ऑक्सिजनची सुविधा देखील करण्यात आली होती. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. माझे वडिल झोपेतच गेले अशी माहिती त्याचा मुलगा अशोक याने ई टाइम्सला दिली.

दिवंगत अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांनी ५० ते ९० च्या दशकात सिनेसृष्टीत अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. पौराणिक मालिका रामायण मधील त्यांची महाराज दशरथ यांचे महामंत्री आर्य सुमंत ही भूमिका फार लोकप्रिय झाली होती. गेट वे ऑफ इंडिया, बरसात की रात, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, नमक हलाल,डिस्को डान्सर,शराबी,त्रिवेदी सारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी काम केले आहे.