राष्ट्रपती रामनाथ कोविंद आर्मी रुग्णालयात भरती 

0
27

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोललं जात आहे. सकाळी रामनाथ कोविंद यांच्या छातीत अचानक दुखू लागले. सध्या राष्ट्रपतींचे रुटीन चेकअप केले जात आहे. राष्ट्रपतींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. लवकर याबाबतची आणखी माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
रामनाथ कोविंद यांचा हरिद्वारमध्ये दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. आज ते या दौऱ्यासाठी रवाना होणार होते. यावेळी ते एका पदवीदान सभारंभात सहभागी होणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला