राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सर्व चित्रकर्मींचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन 

0
30

सदुसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेल्या चित्रपटांच्या यादीत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मानकरी ठरलेल्या ‘बार्डो’, तसेच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेच्या विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या ‘आनंदी गोपाळ’ व ‘ताजमाल’ चित्रपटांच्या टीमसह, राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सर्व चित्रकर्मींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. 67व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांनी आपली ठळकपणे मोहोर उमटवून महाराष्ट्राचा गौरव वाढवल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इतरही अनेक मराठी चित्रकर्मींनी आपल्या कर्तृत्वानं 67व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर ठळकपणे उमटवली आहे. ही मोहोर महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं कौतुक व अभिनंदन केलं आहे.