राहुल वैद्य सोबत लग्नानंतर दिशाने बदलले नाव

0
24

अलिकडेच राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे लग्न झाले. लग्नानंतर हे दोघेजण खूपच आनंदात आहेत. १६ जुलै रोजी दिशा आणि राहुलने एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन घेत अग्नीसमोर सात फेरे घेतले. या दोघांच्या लग्नातले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. नववधूच्या वेषातील दिशा तर खूपच सुंदर दिसत होती. लग्नानंतर राहुलच्या घरी दिशाने गृहप्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने ती मिसेस वैद्य झाली.


दिशाने मिसेस वैद्य झाल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील प्रोफाइलच्या बायो सेक्शनमध्ये ‘DPV’ असे लिहिले आहे. हा दिशा परमार वैद्यचा शॉर्टफॉर्म आहे. याबरोबरच दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रोफाइल फोटो देखील बदलला आहे.