लसीकरण पूर्ण करणाऱ्यांना निर्बंधांमधून सूट मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- अजित पवार

0
21

राज्यात कोरोनाचा धोका पाहता लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जावेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नाही यासोबतच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले.

निर्बंधांना सूट देण्याविषयी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे’ असे अजित पवार म्हणाले आहेत.