लॉकडाऊनमध्ये मिरवणुक रोखल्याने शीख भाविकांचा पोलिसांवर हल्ला, 4 पोलीस जखमी 

0
24

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आहे. परंतु सोमवारी नांदेडमध्ये शिख समाजाने हल्लाबोल मिरवणुकीचे आयोजन केले होते. यासाठी अनेक भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी पोलिसांनी मिरवणुकीला प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडीही फोडली आणि गुरुद्वारा कमिटीने कार्यक्रम गुरुद्वारा परिसरातच केला जाईल असे आश्वासन दिले होते परंतु संध्याकाळी गुरुद्वारा गेटवर मिरवणूक काढण्यासाठी तरुण पोलिसांशी हुज्जत घालू लागले.पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त तरुणांनी गेट तोडून पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये 4 पोलीस जखमी झाले. जमावाने वाहनांचीही तोडफोड केली. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.