लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

0
24

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.  आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी  एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करून इतर पर्यायांची  माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

लाइव्ह अपडेट्स…

मी लॉकडाउनचा इशारा देत आहे, लोकांनी नियम पाळायला पाहिजेत. या संदर्भात बैठकांमधून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेऊन मग निर्णय घेणार- मुख्यमंत्री.

आरोग्य सुविधा कधीही कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री.

रस्त्यावर नक्कीच उतरा, पण लोकांना मदत करण्यासाठी, करोनाला हरवण्यासाठी- मुख्यमंत्री.

लॉकडाउन खूप घातक आहे याची मला कल्पना आहे. पण आपण कात्रित सापडलो आहे. लॉकडाउन केला तर अर्थचक्र ठप्प होईल.

सर्वपक्षीयांनी सरकारला सहकार्य करावं- मुख्यमंत्री.