लोकांचे प्राण वाचवण्यासाठी देशभरात कठोर पाऊलं उचलावी – सीआयआय

0
18

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औद्योगिक उपक्रमांना आळा घालण्यासह देशभर कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन औद्योगिक संघटनेने (सीआयआय) या औद्योगिक संघटनेने केले आहे. सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे, कारण यावेळी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे
उदय कोटक यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘केंद्र आणि राज्य सरकारांकडून आपत्कालीन पायाभूत सुविधा आणि पुरवठा वाढविण्यासाठी काम केले जात आहे, परंतु त्यासाठी वेळ लागेल. या गंभीर टप्प्यावर, जेव्हा लोकांचे जीवन संकटात आहे, सीआयआय आर्थिक क्रियाकलाप मर्यादित करण्यासह मजबूत देशव्यापी पावले उचलण्याची मागणी करते.’
सीआयआयने सूचित केले की जीएनएम / बीएससी प्रशिक्षण पूर्ण केलेले नर्सिंग आणि वैद्यकीय विद्यार्थी आणि जे परीक्षेची प्रतीक्षा करीत आहेत, त्यांची गही मदत घ्यावी. कोविड आयसीयूत एका वर्षाच्या कामानंतर हे भविष्यात क्रेडिट म्हणून मोजले जाऊ शकते. सीआयआयने शहरी आणि ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्ट दुपटीने वाढवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply