वडीलांनंतर दीपिका पादुकोणही अडकली कोरोनाच्या विळख्यात

0
18

देशात कोरोनाचा प्राधुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वसामांन्यांपासून नेता, सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सद्यस्थितीत देशव्यापी लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याची वृत्त होते. त्यानंतर, आता दीपिकाची सुद्धा कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दीपिकाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर, आता अभिनेत्री दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, दीपिकाच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली आहे. सध्या दीपिका बंगळुरु येथे सेल्फ क्वारंटाईन असून उपचार घेत आहे. 

Leave a Reply