‘वाघासारखा दृढ संकल्प करुन लवकरच मी मैदानात उतरेन’; श्रेयस अय्यरचा खास मॅसेज

0
18

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि भारताचा युवा जिगरबाज खेळाडू श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया पार पाडली. हॉस्पिटलमधील बेड्सवरुन श्रेयसने मैदानावरील पुनरामनासाठी खास संदेश दिला आहे. ‘लवकरच मी पुनरामन करतोय’, असा मेसेज त्याने आपल्या चाहत्यांना आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पाठीराख्यांना दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याने मालिकेतून माघार घेतली आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु केले.


इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांनी श्रेयसला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता श्रेयसच्या खांद्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. थेट हॉस्पिटलमधून त्याने आपला लेटेस्ट फोटो ट्विट केला आहे तसंच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती दिली आहे. ‘वाघासारखा दृढ संकल्प करुन लवकरच मी मैदानात उतरेन’, आपल्या सगळ्यांच्या शुभ कामनांसाठी आभार, असं ट्विट त्याने केलं आहे.

Leave a Reply