वाढदिवसाच सेलिब्रेशन पडलं महागात,चेहऱ्याला लागली आग

0
35

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याची पद्धत फार बदलली आहे. सेलिब्रेशन हा प्रत्येकाचा आवडीचा विषय झाला आहे. मात्र हे सेलिब्रेशन किती अंगलट येऊ शकते हे सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये बर्थ डे केक कापणार असलेल्या तरूणाला याचा अंदाजही नसेल की, त्याच्यासोबत केक  कापताना असे काही होणार आहे. केक कापण्यासाठी त्याने चाकू घेतला आणि इतक्यात त्याच्या मित्राने चेहऱ्यावर स्नो स्प्रे स्प्रे केला. केकवरील स्पार्कलर कॅंडलही पेटलेली होती. अशात बर्थ डे बॉय चेहऱ्यावरील स्नोनेही पेट घेतला. तो आग विझवण्यासाठी धडपडत होता.


एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओतील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. अनेकांनी अशा घटनांवर संपात व्यक्त केला. साधी गंमत किती भारी पडू शकते हे यावरून दिसून येते.