वायुसेनेच्या मिग २१ बायसन विमानाला अपघात, ग्रुप कॅप्टन शहीद 

0
26

भारतीय वायुसेनेच्या एका मिग 21 बायसन (MiG-21 Bison) विमानाचा अपघात झाला आहे.या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला.आज सकाळीच हे विमान मध्य भारताच्या एका एअरबेसहून ‘लढाऊ प्रशिक्षण मिशन’साठी रवाना झाले होते. त्यानंतर काही वेळातच या विमानाचा अपघात झाला. आम्ही ग्रुप कॅप्टन गुप्ता यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत, असं म्हणत भारतीय वायुसेनेकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.