विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

0
17

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. नागपुराता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. नागपुरातील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. मात्र आजपासून हवेच्या दिशेत बदल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच येत्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाट सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply