शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण, सध्या प्रकृती स्थिर

0
26

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रिज कँन्डी रुग्णालयात दाखल केले होते.यानंतर त्यांचा त्रास जास्त होत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्यावर केलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.आगामी वेळेत त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया होऊ शकते असे म्हटल्या जात आहे.शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.