शहापूरमधील कुरिअर ऑफिसला शॉर्ट सर्किटमुळे आग, लाखोंचे नुकसान

0
28

शहापूर मधील गोठेघर बीजांकुर हॉस्पिटल जवळ असलेले ATK कुरियर ऑफिसला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. याआगीत पूर्ण ऑफिस जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या ऑफिसच्या आतमध्ये असलेली 4 ते 5 लाख रुपयाची रोख कॅश व लॅपटॉप, कॉम्प्युटर सह इतर सामान जळाले असून अंदाजे 7 लाखापर्यंत नुकसान झाले आहे. Amazon चे पार्सल या ऑफिस मधून डिलिव्हरी व्हायचे सकाळी कर्मचारी ऑफिस मध्ये गेले असताना ऑफिस मधून बाहेर धूर येतांना दिसले त्यांनी बांबूच्या साह्याने ऑफिसचे सेंटर वर केले असता आतमध्ये आग लागल्याचे दिसले त्या नंतर त्यांनी आरडाओरड करून स्थानिक टँकर बोलावून पाणी मारून आग विझवण्यात आली.मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचा माल जाळून खाक झाला होता.