शिवसेना उपनेत्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लसीच्या किंमतीतील तफावतेमुळे पत्र 

0
18

लसीकरणच्या किंमतीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलं आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लसीची किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतींवरुन वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सचिव रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहलं आहे.

रघुनाथ कुचिक यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन या लिहलेल्या पत्रात करोनावरील लसीच्या किंमतींवर बोट ठेवले आहे. त्यांनी पत्रात म्हटलंय की, भारतातील करोनावरील लसींच्या किंमतींबाबत चिंतीत आहोत. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इतर देशांसोबतही करार केला आहे. या देशातील लसींच्या किंमतींमध्ये तफावत आहे. याचाच अर्थ फार्मा कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था भारतात आहे. त्यामुळं भारतातील नागरिकांना पहिले लस मिळावी ही त्यांची पहिली प्राथमिकता आसावी असं नाही वाटतं का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

Leave a Reply