पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी

0
17

IPLमध्ये कोरोना शिरल्यानं सर्वजण टेन्शनमध्ये आहेत. चेन्नई, कोलकाता आणि मुंबई संघाची धाकधूक वाढली असतानाच आता पंजाब संघासाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. पंजाबसंघाचा कर्णधार के एल राहुल मुंबईमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. सर्वजण तो लवकर बरा होऊन मैदानात परत यावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 
1 मे रोजी के एल राहुलच्या पोटात दुखायला लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अपेंडिक्सचा त्रास असल्याचं समोर आल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. राहुलला क्वारंटाइन होऊन त्यानंतरच बायो बबलमध्ये येता येणार आहे. तो लवकरच संघासोबत जॉइन होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. पुढच्या 8 एक दिवस त्याला आरामाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे

Leave a Reply