संजय दत्त यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

0
28

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांनी कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे.त्यांनी बिकेसी जम्बो कोविड सेंटर मध्ये ही लस घेतली. त्यांनी लस घेतल्याचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केला आहे.तसेच त्यांनी संपूर्ण टीमचे सुद्धा आभार मानले आहेत. त्यांनी नुकतेच कॅन्सर सारख्या भयावह बिमारीवर मात मिळवली आहे.
संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम राबवल्या जात आहे.आता ही मोहीम दुसऱ्या टप्प्यात असून यामध्ये जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव बघता हालचाली अजून वेगवान केल्या जात आहेत.तसेच लसीकरण करण्यासाठी अनेक नेते अभिनेते लस घेऊन लोकांना आवाहन करत आहेत यामध्येच संजय दत्त यांनी लस घेऊन सगळ्यांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.