सचिन वाझे केस : 13 तासांच्या तपासानंतर NIA कडून मीना जॉर्ज महिलेस अटक 

0
21

अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली होती.आता एनआयएने विमानतळातून मीना जॉर्ज या महिलेला अटक केली आहे. मीरा रोडवरील फ्लॅटमध्ये महिलेची चौकशी केली जात आहे. या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्या काळ्या पैश्याबाबद सामील असल्याचे म्हटले जातेय. ती दोन आयडी घेऊन हे करत होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती.