सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

0
23

सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का बसला आहे. टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. अध्यक्षपदाच्या लढतीत उद्योगपती रतन टाटा हे विजयी झाले आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यास योग्य म्हटले आहे. त्यामुळे रतन टाटांचा विजय झाला आहे. तर मिस्त्री यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे.
टाटा सन्स लिमिटेड ही टाटा समूहाची कंपनी आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे सायरस मिस्त्री यांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचे औचित्य सिद्ध केले आहे. त्याचबरोबर, टाटा आणि मिस्त्री या दोन्ही समूहानी एकत्रितपणे हा वाद सोडवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.