सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर कलम १७७ अंतर्गत दाखल होणार गुन्हा

0
23

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकणी नागरिक मोठ्या प्रमाणात थूंकून घाण करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थूंकल्यामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका असतो. सार्वजिनिक ठिकाणी थुंकल्यास आता थेट मुंबई पोलीस गुन्हा दाखल करुन कारवाई करणार आहेत. उच्च न्यायालयाने तसे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता थुंकिबहाद्दरांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयात दिनांक ०७/०४/२०२१ रोजी याचिकाकर्ती नामे अरमीन वांद्रेवाला यांनी महाराष्ट्र्‌ राज्य व इतर यांचे विरुध्द दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक ९५००/२०२१ अन्वये मा. उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई पोलीस दलास दिलेल्या निर्देशागुसार बिनतारी संदेशद्वारे बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आदेशित करण्यात आलेले आहे. की, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मोठया प्रमाणावर थुंकून घाण करतात अशा ठिकाणांची माहिती प्राप्त करुन सदर नागरिकांवर कलम ११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणार्‍या इसमांना जागृत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोलीस वाहनाच्या ध्वनीक्षेपकावरुन किंवा मेगा फोनव्दारे थुंकल्याचे होणारे दुष्परिणामाबाबत माहिती देऊन जनजागृती करावी. पोलीसांना या मोहिमेकरिता मदत करणाऱ्या इसमांना प्रोत्साहित करण्यात येत असून त्यांना योज्य ते संरक्षण दिले जाईल असे सादर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.