सावध व्हा ! देशात आतापर्यत एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू 

0
24

भारतात गेल्या २४ तासात तब्बल ६१४८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. करोना सुरू झाल्यापासूनचे आतापर्यंतचे हे सर्वात जास्त मृत्यू आहेत. मृत्यूचा आकडा अचानक एवढा वाढण्यामागचं कारण म्हणजे बिहारमधील समावेश नसलेल्या ३९५१ मृत्यूंचा समावेशही या आकडेवारीत करण्यात आला आहे. बिहारमधील सुधारित आकडेवारी वगळल्यास गेल्या २४ तासातील एकूण मृत्यू २१९७ एवढे आहेत.

बिहारने बुधवारी करोना मृतांची सुधारित आकडेवारी जाहीर केली. यामुळे बिहारमधील एकूण मृत्यू ९४२९ एवढे झाले आहेत. दरम्यान, बिहारमधील ३९५१ पैकी बहुतांश मृत्यू हे दुसऱ्या लाटेतच झाले आहेत. बिहारमध्ये ७ जूनपर्यंत मृतांचा एकूण आकडा ५४२४ एवढा होता, तर गेल्या २४ तासात २० जणांचा मृत्यू झाला आहे.सर्वाधिक मृत्यू असलेल्या राज्यांमध्ये बिहार आता १७ वरुन १२ व्या क्रमांकावर आलं आहे