सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; सर्व विभाग प्रमुखांनीअधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे

0
27

सिंधुदुर्ग– भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बैठक घेत आपल्या अधिनस्त यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना केली. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने रस्ते खुले करण्यासाठी पथके तैनात ठेवावेत असे सांगितले.

जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.