सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0
24

बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत  यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली.


यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’ यावर रजनीकांत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.