सुशांत सिंह राजपूतच्या रूममेटने लग्नासाठी न्यायालयाला मागितला जामीन 

0
22

स्वतःच्या लग्नाचे कारण देत 28 वर्षीय सिद्धार्थ पीठानीयाने जामिनाचा अर्ज केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने  बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणातल्या ड्रग्सबाबत  त्याचा रूममेट असलेल्या सिद्धार्थ पीठानी याला 26 मे रोजी हैदराबादमधून अटक केली होती आणि त्याला मुंबईत आणले गेले होते.

त्याने न्यायालयासमोर सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की 26 जून रोजी हैदराबाद इथे त्याचे लग्न आहे. त्याने आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही न्यायालयासमोर सादर केली आहे. त्याचे वकील तारक सय्यद यांच्यामार्फत त्याने ही विनंती केली आहे. या त्याने म्हटले आहे की सदर प्रकरण हे सुशांतच्या घरातला मदतनीस आणि सहसंशयित सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्या ग्राह्य धरण्याजोग्या नसलेल्या जबानीवर आधारित आहे. या दोघांनी केलेल्या दाव्यानुसार सिद्धार्थ गांजा खरेदी करत असे.