सेन्सेक्स अन निफ्टीत मोठी घसरण, तासाभरात एक लाख कोटीचे नुकसान 

0
31

देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरू झाले आहेत.यामुळे पुन्हा लॉकडाउन झाले तर अर्थव्यवस्था संकटात सापडेल, या भीतीने गुंतवणूकदारांनी गुरुवारी विक्रीचा सपाटा लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. आजच्या एक तासात झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे एक लाख कोटीचे नुकसान झाले आहे. सध्या सेन्सेक्स ७७० अंकांनी घसरला असून तो ४८४०९ अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६३ अंकांनी कोसळला असून तो १४२८३ अंकावर आहे.मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २८ शेअर घसरले आहेत.राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर ११ शेअरने वर्षभराचा नीचांकी स्तर गाठला आहे.