सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत अंतिम इंडिया लेजेंड्स अन श्रीलंका लेजेंड्स आमनेसामने 

0
26


 
आज (21 मार्च) रोजी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना इंडिया लेजेंड्स विरुद्ध श्रीलंका लेजेंड्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. रायपूरमधील शहिद वीर नारायण सिंह आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये या मॅचचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतिम सामन्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या 2011 च्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या अंतिम सामन्यातही हे दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते.

इंडिया लेजेंडस : सचिन तेंडुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कॅफ, एस बद्रीनाथ, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठान, मुनाफ पटेल, मनप्रीत सिंह गोनी, प्रज्ञान ओझा, आर विनय कुमार, नोएल डेविड आणि नमन ओझा.

श्रीलंका लेजेंड्स : तिलरकत्ने दिलशान(कर्णधार), चमारा सिल्वा, दुलंजना विजिनसिंघे, मलिंदा वारनपुरा, सनथ जयसूर्या, उपुल थरंगा, अजंता मेंडिस, धमिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, रंगना हेराथ, थिलन तुषारा, चिंतका जयसिंघे, परवेज महारूफ, रसेल आर्नोल्ड आणि चमारा कपुगेदरा.