सोलापुरात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट, दोन जण ठार

0
16

सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला आहे.यामध्ये दोनजण ठार झाल्याची माहिती हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. माणिक गुर्रम यांनी दिली आहे. या स्फोटात एक रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.
ज्यावेळी स्फोट झाला त्या ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या आईला भेटायला आलेले रुग्णाचे नातेवाईक हणमंत क्षीरसागर वय वर्षे ३९ हे घटनास्थळी बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, मात्र स्फोटात उडालेल्या पावडरमुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरे रुग्ण सुनील लुंगारे हे कोरोना उपचारासाठी दाखल झाले होते. त्याची तब्येत अगोदरच खालावली होती. त्यामुळं या स्फोटानंतरच्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर त्यांचा मृत्यू झाला.