स्वतः च संशयाच्या फेऱ्यात असलेल्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा – प्रविण दरेकर

0
34

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक असुन पोलीस दलात सुरू असलेल्या घटना या पत्राव्दारे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहेत. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस विभागातली धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहेत, पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे, महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली गेली असून स्वतःच संशयाच्या फेऱ्यात आलेल्या अनिल देशमुख यांना गृह मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी दरेकर यांनी केली.
राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांनी या सर्व बाबीची दखल घेऊन तत्काळ चौकशी करावी. तसेच अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का, याचा खुलासा महाविकास आघाडी सरकारने करावा, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.